Monday, May 11, 2020


आपण सगळे शाळेत असताना रोज प्रतिज्ञा बोलायचो पण त्याचा खरा अर्थ आज समजला आपण म्हणायचो
"
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहे.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे."
याचं ओळीं प्रमाणे जणु आज सम्पूर्ण भारत एकजुटीने करोना च्या विरुद्ध लढत आहे. यात आपले शासन आणि प्रशासन दोन्ही एकत्र काम करत असून त्यांना आपले डॉक्टर, पोलीस आणि सरकारी कर्मचारी चांगलीच साथ देत आहे.
"
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन"
यालाच अनुसरून अनेक उद्योजक देशाला आर्थिक मदतीला पुढे आले तेच नाही तर अनेक स्वयंसेवी संस्था आणि ट्रस्ट ही पुढे येऊन काम करत आहेत.यात कुठेही जात-पात,धर्म, उच्च-नीच बघितली जात नाही सर्व एकत्र येऊन भारतीय म्हणून काम करत आहेत.
"
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन"
याच प्रमाणे आज भारतातील प्रत्येक नागरिक आपल्या घरातील प्रत्येकाची काळजी घेत आहेत आणि नियमांचे पालनकरत आहेत.
"
माझ्या देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यातच माझे
सौख्य सामावले आहे"
याच वाक्या प्रमाणे आज सर्व देशातील मेडिकल, किराणा दुकाने, शेतकरी आणि त्यानीं पिकविलेल्या  वस्तू आपल्याला प्रयत्न पोचवणारा प्रत्येक  देशवाशिय आपले कर्तव्य पार पाडत आहेत तसेच घरी बसून  शासनाच्या आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणारा प्रत्येक जण आपले कर्तव्य पारपाडत आहे  या सर्वंच्या साथीने आपण ह्या जगतीक करोना महामारी संकटातून बाहेर येणार याची खात्री बाळगतो
जय हिंद

No comments:

Post a Comment