Tuesday, April 7, 2020

कळसुबाई :- महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर.

एक नवीन ट्रॅकचा अनुभव आपल्या नवीन  ग्रूप बरोबर ,

जस आपल्याला माहित आहे महाराष्ट्र दोन गोष्टीसाठी खूप जग प्रसिद्ध आहे एक म्हणजे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रला लाभलेल्या डोंगर दऱ्या आणि या दऱ्या खोऱ्यात फिरणाऱ्या प्रत्येक ट्रॅकर च्या मनात इच्छा असते ती महाराष्ट्राच्या सगळ्यात उंच कळसुबाई शिखरावर जाण्याची, तशीच आम्हा ट्रॅव्हल प्रेमीची पण होती. अचानक आमच्या ट्रॅव्हल प्रेमी मित्र सुहास नी आम्हाला निशांत यांच्या yahi malad unit या ग्रुप बद्दल सांगितले त्याच बरोबर  त्यांच्या कळसुबाई ट्रॅक बद्दल सांगितले. आम्ही लगेच सुहास च्या मदतीने त्यांच्या ग्रूप मधे सहभागी झालो आम्हाला सर्व ट्रेक बद्दल ची माहिती सूचना वेळोवेळी आमच्या ग्रूप वरुन सांगण्यात येत होती.आमचा प्रवास शनिवारी रात्रीच चालु होणार होता त्यानुसार आम्ही तयारी केली. 
          अखेर शनिवार उगवला  ठरल्या प्रमाणे सगळे ऑफिस मधून येऊन तयारी करुन आपापल्या पिकअप पॉईंट ला पोहोचले.बस गोरेगाव वरुन निघून एक एक करत पिकअप करत बोरिवली ला पोहोचली. तेथे टीमच्या सिनियर सदस्यांनी बस ची पूजा करत श्रीफळ वाढवत प्रवासाचा शुभारंभ केला.


प्रवास सुरु झाला मुंबई ते कळसुबाई (बारी गाव) हा प्रवास जवळ पास - तासाचा होता रात्र असल्याने सगळे बस मधे शांत झोपले होते. रात्री अंधार असल्यामुळे बाहेरच  कायही दिसत नव्हत.असंच प्रवास करत सुमारे :३० च्या सुमारास सगळे  साखर झोपेत असताना टीम लिडर नी आपण  पोहोचत आलो अशी घोषणा केली हे ऐकताच आमची झोप लांब पळून गेली आणि आम्ही सगळे बॅगा घेऊन खाली उतरलो. अंधार असल्याने आम्ही बॅटरी चा प्रकाशा मध्येच बारी गावात प्रवेश केला तेथे गावातच खाडे यांच्या खानावळीत आमची सगळी सोय केली होती.तेथे पोहोताच टिम लिडर ने 30 मिनिटात तयारी करून नास्ता करून ट्रॅक साठी तयार व्हायला सांगितले.सगळे पटापट  तयार झाले चहा नास्ता करून लगेचच सगळे एकत्र गोल करून उभे राहिले आधी सर्वानी आपली आपली ओळख करून दिली त्यानंतर टीम लिडर संदीप दादा आणि निशांत यांनी महत्वाच्या सूचना दिल्या त्यात त्यांनी ट्रॅक करताना संदीप दादा गाईड काका बरोबर सगळ्यात पुढे तसेच निशांत सर्वात शेवटी राहणार आम्हाला दोघांच्या मध्ये राहायचे होते त्याच बरोबर कोणीही ग्रुप सोडुन बाजूला जाऊ नये अश्या प्रकार च्या सूचना दिल्या गेल्या आणि सगळ्यांनी होकार देत पुढची वाटचाल चालु केली 





गावातून थोड पुढे येताच आमच्या नजरेस आलं ते गावकऱ्यांची शेतजमीन त्याच बरोबर शेतात पिकलेलं पीक सकाळच्या कौवल्या सूर्यकिरणात हे पीक  जणु सोन्या सारखे भासत होते अश्या अभूतपूर्व निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुढचा प्रवास चालु ठेवला जवळ पास 25 मिनिटे चालल्यावर आम्ही पोहोचलो कळसू मातेच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरा जवळ या मंदिरात ज्या भाविकांना शिखरावरील मंदीरात जाण शक्य होत नाही ते  येथे दर्शन घेतात. मंदिराच्या शेजारीच आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेले एक कमान दिसते  इथूनच शिखरावर जाणाऱ्या वाटेची सुरुवात होते. आम्ही मंदिरात दर्शन घेऊन पुढे मार्गस्त झालो आम्ही सुरुवात 



तशी जरा हळूहळूच  केली आम्ही एक एक टप्पा पार करीत पुढे जात होतो. मध्ये काही ठिकाणी गावकऱ्यांनची दुकान ही होती तेथे थोडा वेळ बसुन आम्ही पुन्हा पुढच्या  मार्गवर निघायचो अस करत आमचा प्रवास चालूच होता जवळ पास तासाने आम्हाला पहिली लोखंडी पायरी दिसली अश्या प्रकारच्या एकूण पायऱ्या या प्रवासात आपल्या ला दिसतात प्रवाशांना कठीण कातळ भागात चढण्यासाठी या पायऱ्या लावण्यात आल्या आहेत. तसेच हया प्रवासात खुप चढ, उतार, दगडी तर कधी तीव्र चढन असल्याने आपली चांगली दमछाक होते





असे करत आम्ही जवळ पास 3 तासात शेवटच्या टप्प्या परत पोहोचलो तेथे आम्हाला निसर्गाचा अजून एक चमत्कार पाहायला मिळाला तो म्हणजे एव्हड्या उंचावर स्वच्छ अतिशय थंड गार पाण्याची विहीर जी १२ ही महिने कधीही सुकत नाही येथेच थोडा आराम करुन थंड पाणी पिऊन शेवटच्या टप्प्या कडे आम्ही निघालो थोडा चालल्यावर आम्ही शेवटच्या म्हणजेच ४थ्या पायरी  जवळ आलो आणि एक एक करून आम्ही महाराष्ट्रतल्या सर्वात उंच शिखरावर आमचे पाहिले पाऊल टाकले आणि त्याच बरोबर कळसुबाई शिखर सर करत ट्रॅक पण पूर्ण केला.या उंच शिखरावरून खाली बघताना निसर्गाची विविधता पूर्ण रचना आपणास दिसुन येते.एकीकडे भंडारदरा धरण तर मागच्या बाजूस  अलंग मदन कुंलग सारखे किल्ले आपणास दिसतात त्याच बरोबर कळसू माते चे मंदिर पाहुन हा एव्हडा उंचा वर हे मंदिर कोणी, कधी आणि कसे बनवले असेल हा प्रश्न पण पडतो??









परंतु आपण ही आपली राष्ट्रीय तसेच नैसर्गिक संपत्ति चे जतन आणि संवर्धन केले पाहिजे म्हणून नेहमी आपण तत्पर राहिले पाहिजे



कळसुबाई शिखराची माहिती
( कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. भंडारदरा धरण येथून कि.मी वर आहे. तेथे दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे पाहाता येतात.)


(कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय.)





कळसुबाई. पोहोचण्याच्या वाटा :
) या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदर्यापासूनबारीहे गाव अवघ्या कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदर्याला

जाणार्या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास तास लागतात
) वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरुन भंडारदर्याला जातांना, भंडारदर्याच्या अलिकडे कि.मी अंतरावरबारीहे गाव आहे








No comments:

Post a Comment